“माननीय श्री.नामदेवराव चौकडे (सावजी) यांच्या षष्ठीपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमास दिनांक ०८ जुलै २०२५ रोजी,सायंकाळी ७:३० वाजता,तुळजाई हॉटेल अँड लॉन, दारव्हा रोड,MIDC जवळ, लोहारा,यवतमाळ येथे आर्णी पंचायत समितीचे माजी सभापती राजू भाऊ विरखेडे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा त्यांना शुभेच्छा दिल्या.
साठ वर्षांचा जीवनप्रवास म्हणजे प्रेम,त्याग,कष्ट आणि मार्गदर्शनाचा आदर्श. असून नामदेवराव चोकडे काकांचा जीवनप्रवास हा प्रेरणादायी आहे असे मत राजू भाऊ विरखडे यांनी व्यक्त करून त्यांच्या दीर्घायुष्याच्या आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या.
या वेळी त्यांच्या सोबत राजू भाऊ विरखडे यांचा मित्र परिवार उपस्थित होता.
