शिवसैनिक हा मुळातच आक्रमक व आंदोलक असतो त्याचा प्रत्यय आज मुंबईत आला.मुंबई मंत्रालया जवळ असनाऱ्या आमदार निवास कॅन्टीन मध्ये शिळे अन्न दिल्याने बुलढाणा येथील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे आक्रमक झाले त्यांनी या संदर्भात जाब विचारत कामगारास चांगलेच फटकावले यावरून आमदार संजय गायकवाड यांच्यातील शिवसैनिक अचानक जागा झाल्याची चर्चा होती
नेमकं काय घडलं?
मुंबई स्थित आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काल (8 जुलै) रात्री जेवणाची ऑर्डर दिली. त्यांना ऑर्डरप्रमाणे रूममध्ये जेवणही पुरवण्यात आलं. मात्र जेवणात देण्यात आलेलं डाळ आणि भात हे शिळ होतं व त्याचा वास येत होता, असा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी थेट आमदार निवासातील कॅन्टीन व्यवस्थापकाला धारेवर धरलं. यापूर्वीही मी कॅन्टीनमधील जेवणाची दोन ते तीन वेळा तक्रार केली असल्याचे संजय गायकवाड यांनी माध्यमांना सांगितलं
संजय गायकवाड काय म्हणाले?
आमदार निवासमध्ये डाळ-भात आणि पोळी जेवण मागवलं होतं. पहिला घास खाल्ला तर आंबट लागला आणि मला उलटीही झाली. त्यानंतर मी डाळीचा वास घेतला, तर भयंकर होता. त्यामुळे मी जाब विचारण्यासाठी कॅन्टिनमध्ये गेलो. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात लोक इथे येतात. तसेच याआधी देखील मी दोन-तीन वेळा त्यांना समज दिली होती. एका आमदाराला हे लोक जर विषारी जेवण देतात, मग सामान्य माणसांचं काय होत असेल?, असा सवाल संजय गायकवाड यांनी उपस्थित केला.