महिलांच्या बचत गटाच्या कर्तुत्वाचे कौशल्याचे प्रदर्शन…
आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे ऊर्जा प्रभाग संघ बोरगाव भंडारी च्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली
त्यामध्ये उमेद अंतर्गत असणाऱ्या विविध समूहाने आपले उत्पादनाची स्टॉल लावले होते. उमेद अभियाना तील स्वयंसहायता महिला बचत गटाने नारीशक्ती स्वतःची स्वयंसहायता करु शकते हे स्पष्ट करून दाखविले स्वयंसहायता समूहातून तयार करून उत्कृष्ट उत्पादने साधने घरीच तयार करून विना केमिकल चे साधने स्वतःच्या असते तयार करून स्टॉलमध्ये विक्रीकरिता विविध गावातून आणले होते यावेळी त्यामध्ये उत्पादक हळद, मसाले,चिवडा, राख्या, मशरूम, लोणचं, भाकर वड्या, कच्चा चिवडा, पापड, चटणी पावडर ह्या वस्तू स्टॉलवर ठेवण्यात आले होते या सर्वसा धारण सभेला उपस्थित प्रभाग संघाच्या अध्यक्ष जयश्रीताई पुनवटकर व प्रमुख मार्गदर्शक म्हणून BM-IBCB राहुल देशमुख सर जवळा प्रभाग समन्वयक अविनाश पुनवटकर सर, विनोद राठोड सर तसेच प्रभाग समन्वयक किशन शेळके,प्रभाग कृषी व्यवस्थापक मनोज जाधव, वर्षा गायकवाड, संध्या ताई देशमुख, प्रभाग संघ व्यवस्थापक वर्षाताई घोरपडे, व ऊर्जा प्रभाग संघातील संपूर्ण कॅडर व ग्राम संघचे पदाधिकारी आणि स्वयंसहायता समूह मधील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.