भारतीय संस्कृतीत गुरू शिष्या च्या नात्याला अनन्य साधारण महत्व आहे.शाळेत गुरुजन विध्यार्थी यांचे भविष्य घडवतात.
काही शिक्षक केवळ पेशा नोकरी म्हणून ज्ञान दानाचे कार्य करत नाहीत तर ते विध्यार्थीना आपुलकी जीव लावतात.अशा शिक्षकां प्रति मग विध्यार्थी देखील भावनिक होतात.
आर्णी हे तालुक्याचे गाव येथील लोकसंख्या पहाता मोठ्या खासगी शिक्षण संस्था आहेत.
अशाच एका कथित इंटरनॅशनल नावाने असलेल्या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून एक शिक्षिका कार्यरत होत्या त्यांनी त्यांच्या काळात विध्यार्थी घडविताना विशेष काळजी घेतली व सेवा विध्यार्थी व पालकांच्या मनात त्यांनी स्थान मिळवले पण त्या शाळा प्रशासनाने अचानक त्या शिक्षिकेस शाळेवरन कमी केले
ही बातमी विद्यार्थी व पालकाना समजताच सर्व भावुक झाले शाळा सोडण्या पेक्षा प्रस्थापित झालेले ऋणानुबंध तुटत असल्याने जड अंतकरणाने त्या मुख्याध्यापक बाई ने आर्णी चा निरोप घेतला.
पुढे त्या आसाम राज्यातील गोवाहाटी येथील शाळेत नोकरी पत्कारली पण अचानक आपल्या जुन्या विद्यार्थ्यांची आठवण आल्या बरोबर त्यांनी थेट आर्णी गाठली व त्या शाळेत विध्यार्थी यांना भेटण्यासाठी इच्छा व्यक्त केली.
पण केवळ शिक्षणाच्या नावाखाली बाजार भरवणार्या निर्दयी मंडळींनी ही भेट नाकारली व विद्यार्थ्यांना देखील न भेटण्यासाठी तंबी दिली.
आज जेव्हा त्या आर्णी येथे आल्या तेव्हा येथील अंजली ड्रेसेस येथे काही वेळ थांबल्या
बबीता जवेरी असे त्यांचे नाव
आर्णी आले असता अंजली ड्रेसेस येथे त्यांच्या सत्कार करण्याकरिता
राजेश भाऊ श्रीवास पत्रकार नौशाद अली सर पत्रकार परवेज बेग, आरीफ भाटी, करिष्मा शेख, सियान भाटी, झुबेदा, मालांनी मरिया पठाण, झैनाब दितावत, समरा पठाण, तासमिया मालानी, हुमेरा शेख,सना बेग, अशरफ शेख,आदी उपस्थित होते त्यावेळी त्यांचा विद्यार्थ्यांच्या प्रति असलेला कळवळा पाहून सर्वच भावुक झाले श्रीमती बबिता याचे देखील डोळे पाणावले.