7k Network

युवा मंच ने जपली सामाजिक संवेदना,जखमी वृद्धास केली मदत…!

आर्णी-यवतमाळ महामार्गावर आर्णी शहरा लगत अपघात झाला असल्याची माहिती आर्णी येथील युवा मंचच्या काही सदस्यांना मिळाली असता सामाजिक कार्यकर्ते प्रशिक मामा नगराळे व सदस्य घटनास्थळी जाऊन तेथील जखमी अवस्थेत पडलेल्या वृद्धास खाजगी रुग्ण रुग्णवाहिकेतून स्थानिक ग्रामीण रुग्णालयात नेऊन त्याचेवर उपचार करून घेतले. त्यानंतर अपघातग्रस्त रुग्णाची विचारपूस केली असता तो कळंब जि.यवतमाळ या गावचा असल्याचे समजले. त्याची विचारपूस केली असता त्याचे सगे- सोयरे व ईतर नातलग नसल्याचेही जखमी कडून समजले.
त्यानंतर युवा मंचचे प्रशिक मामा नगराळे यांनी आर्णी येथील मातोश्री वृद्धआश्रमचे संचालक खुशालभाऊ नागपूरे यांच्याशी संपर्क साधून त्या जखमी रुग्णाला आपल्या आश्रमात ठेवण्यास विनंती केली. त्यावरून खुशालभाऊ नागपूरे यांनी विनंतीला मान देऊन त्या जखमी रुग्णाला सांभाळण्याची जबाबदारी घेतली.
यावेळी युवा मंचचे विकी क्षीरसागर, सिद्धू जाधव,अजय शिंदे, अक्षय मानकर,तसेच युवा मंच आर्णीचे सदस्य उपस्थित होते.

युवा मंच च्या या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!