नागरिक महिला पुरुषांनी उपोषण करून विविध राजकीय पक्ष व त्यांचे नेते पत्रकार यांचा पाठींबा असतांना देखील रस्त्यांवर असलेले अतिक्रमण काढण्यास आर्णी नगरपरिषद टाळाटाळ करत आहे.
कुठल्या राजकीय दबवाचा नगरपरिषद प्रशासन बळी पडले आहे हे मोठे कोडे आहे.
नगर परिषद ला रस्ता मोकळा करण्याचा मुहूर्त सापडेना
नगर परिषद आर्णी अंतर्गत चिंतावर लेआउट मधिल रोडवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी या परिसरामधिल लोकांनी मागिल 15=7=25 पासून उपोषण सुरु केले आहे.
मात्र नगर परिषद चे मुख्याधिकारी रविन्द्र राऊत यांनी अद्याप ठोस कार्यवाही केली नाही.
रोडच्या दोन्ही बाजूला झालेले अतिक्रमण कीती आहे,रोडची रुंदी कीती आहे हे फीक्स करुन रोडवर असलेले बांधकाम काढणे पुर्णपणे अजूनही मुख्याधिकारी रविन्द्र राऊत यांना जमलेच नाही.
रोडच्या दोन्ही बाजूने असलेले बांधकाम यांच्याशी संबधिताना नगर परिषद कडून अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
मात्र कोणाच कीती अतिक्रमण आहे हे अद्यापही ठाम पणे नगर परिषद कडून सांगण्यात आलेले नाही.
हे ठरवून पुर्ण रोड मोकळा करणे गरजेचा आहे.
नगर परिषद ला हे काम करता आले नाही.
आज अठरा दीवस पुर्ण झाले.
उपोषण चालू आहे,यात महीला,पुरुष, विद्यार्थी, ज्येष्ठ मंडळी उपोषण करत आहेत.
तरी सुध्धा नगर परिषद मात्र ठोस कार्यवाही करायला तयार नाही.
जोपर्यत रोड पुर्ण मोकळा होत नाही,तोपर्यत ऊपोषण सुरुच राहील असी भुमिका उपोषण करणार्या नागरीकांनी घेतली आहे.
जिलाधिकारी विकास मिना यांचे अतिक्रमण विरोधी धोरण असताना मात्र आपल्या वरिष्ठ अधिकार्याला सुध्दा आर्णीचे मुख्याधिकारी जुमानत नाही.
त्यांच्या आदेशालाही केराची टोपली दाखवत आहे.
अस्या कामचूकार अधिकार्यावर आता जिल्हाधिकार्यानी कार्यवाही करावी असी संतप्त प्रतिक्रिया उपोषण कर्त्यानी बोलताना दीली आहे.