पुणे शहरातील गोरसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने शिवनेरी या नामदार संजय भाऊ राठोड यांच्या शासकीय निवासस्थानी भेट दिली. या भेटीदरम्यान पुणे शहरात संत श्री सेवालाल महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली.
यासंदर्भात लवकरच एक भव्य मेळावाही आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, शिष्टमंडळास आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन ना.संजय भाऊ राठोड यांनी देऊन त्यांच्या सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या.
या वेळी गोरसेना पुणे अध्यक्ष श्री. राज चव्हाण, उपाध्यक्ष श्री. मलेश पवार, बहुजन स्वराज्य सेनेचे श्री. अजित इंगळे, क्रांतिकारी विश्वस्त श्री. राकेश चव्हाण, उद्योगपती श्री. धर्मा पवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गट) पुणे अध्यक्ष श्री. अश्विन खुडे, उद्योगपती श्री. अमरीश राठोड, उद्योजक श्री. संकेत कडू, सहाय्यक सदस्य श्री. ज्ञानेश्वर बने तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.