आर्णी बस स्टँडवर प्रवाशांची मोठी गैरसोय — डेपो मॅनेजर झोपेत
आर्णी (प्रतिनिधी) : आर्णी बस स्थानकावर प्रवाश्यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. कडाक्याच्या उन्हात प्रवाशांना उभं राहून बसची वाट पाहावी लागते. ना पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे, ना सावलीत बसण्याची व्यवस्था. अशा परिस्थितीत वृद्ध, महिला व लहान मुलांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक प्रवाशांनी एस.टी. प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या, परंतु कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही त्यांच्याकडून केवळ आश्वासनेच मिळत आहेत. या बाबत विचारणा केली असता, डिपो मॅनेजर व डीसी यांनी दुर्लक्षाचे धोरण स्वीकारल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की संबंधित डीसी यांना आर्णी आगार, तेथील कर्मचारी व प्रवाश्यांशी काहीही देणेघेणे नाही असे त्यांचे वर्तन दर्शवते.
प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून पिण्याच्या पाण्याची, सावली व बसण्याच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवासी करत आहेत.