धावांचा पाठलाग करतांना उपयुक्त विजयी धावा काढण्यासाठी विराट कोहली चे नाव घेतले जाते.त्यांना चेस मास्टर देखील म्हटलं जातं
२०२५ च्या मोसमात आर सो बी म्हणजे रॉयल चॅलेंज बंगरुळू संघाच्या विजयात ९४% धावा विराट कोहली च्या आहेत.
सर्वाधिक धावा काढून विराट कोहली कडे ऑरेंज कॅप होती मात्र त्याच्या खालोखाल धावा करणारा गुजरात टायटन चा साई सुदर्शन याने राजस्थान रॉयल विरुद्ध खेळत कोहलीस पाठीमागे टाकलं ऑरेंज कॅप मिळवली.
यामुळे साई सुदर्शन पुन्हा पहिल्या क्रमांकावर आहे, त्याने नऊ डावांमध्ये ४५६ धावा केल्या आहेत. त्याने आरआर विरुद्ध ३० चेंडूत ३९ धावा केल्या आहेत. ही त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळी नाही, परंतु कोहली (४४३) पेक्षा १३ धावांनी पुढे आहे आणि सूर्यकुमार (४२७) पेक्षा २९ धावांनी पुढे आहे. आरआर विरुद्ध जीटी सामन्याच्या अखेरीस, इतर दोन फलंदाजांनीही पहिल्या पाचमध्ये आपले स्थान पक्के केले होते.
तरीही स्पर्धा तीन फलंदाजात असणार आहे.