पुरुषांच्या बरोबरीने कुठल्याही क्षेत्रात महिला कुठेच कमी किंवा मागे रहात नाहीत गरज असते त्यांनां कुटुंबातील प्रोत्साहन व सहकार्य करण्याची.
सोलापूर जिल्ह्यातील एका महिलेने जिद्द व चिकाटी परिश्रमव कुटुंबाच्या पाठबळावर एक यशस्वी उद्योजक म्हणून आपले नाव केले. सौ.पल्लवी वाले असे त्यांचे नाव असून त्यांचे शिक्षण १२ वि पर्यंत झाले.,लग्ना नंतर अर्धवट रशिलेले शिक्षण घेण्यासाठी पती ने पाठबळ दिले अन पल्लवी ताई पदवी पर्यंत शिक्षण घेऊ शकल्या.
लग्नापूर्वी त्यांच्या माहेरची आर्थिक स्थिती जेमतेम होती.तेव्हा पूरक व्यवसाय करण्याचा त्यांचा मानस होता पण तेव्हा ते पूर्ण होऊ शकले नाही मात्र विवाहा नंतर पतींचे यातही सहकार्य लाभले. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिकच वाढला.
पल्लवी ताईने घर संसार सांभाळत बी कॉम ची पदवी पूर्ण केली त्यांनी घरीच किराणा दुकान सुरू केले,मेस चा प्रयोग केला.यात पती धनराज मुलगा मयूर,मुलगी प्राची यांचीही साथ मिळू लागल्याने पल्लवीताई उत्साहित होत्या. खूप मेहनत करून नशीब मात्र साथ देत नव्हते त्यात कोरोनाच्या काळात व्यवसाय संकटात आला पण त्यानंतर पल्लवी ताई ने पुन्हा उभारी घेत गूळ चहा प्रीमिक्स व पूरनपोळी प्रीमिक्स याचा प्रयोग त्यांचा चांगलाच लौकिक झाला. यातून त्यांचे चांगलेच नाव झाले.
शिवणकला करूनही त्यांनी जम बसवला होता पण कोरोनाच्या काळात तोही बंद पडला पण संकटात ही संधी शोधण्यासाठी संधी मिळते.तशी संधी पल्लवी ताई ला मिळाली त्यांनी आरोग्यासाठी पोषक गुळाच्या चहा च्या पावडर चे प्रीमिक्स बनविले. सोशिअल मीडिया व यु ट्यूब वरून माहिती मिळवली.
यासाठी त्यांनी सोलापूर विज्ञान केंद्रातील विशेतज्ञ सौ.अनिता सराटे यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांच्या कडून प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण घेतले.बाजारपेठे चा अभ्यास केला. आणि मग २०२२ मध्ये गूळ चहा प्रीमिक्स हा व्यवसाय सुरू केला.
असा होतो चहा तयार
पल्लवी ताई ने तयार केलेल्या गूळ चहा प्रीमिक्स पाणी व दुध हेच साहित्य लागते.एरवी गुळाचा चहा फुटतो पण पल्लवी ताईंच्या प्रीमिक्स चा चहा फुटत नाही. सोबतच त्यांनी शेवगा,बिट, आवळा यापासून हेल्थ ड्रिंक देखील तयार केले.
चहातही विविध स्वादाचे प्रीमिक्स
गुळाच्या चहात वेगवेगळे स्वादाचे प्रीमिक्स बनवले त्यात आले,मसाला, वेलदोडा,गवती व हॉट कॉफी असे चव असलेल्या चहा पावडर ची निर्मिती केली.
सुरवातीला त्यांनी ग्राहकांना मोफत प्रीमिक्स दिले त्यानंतर मात्र लोकांना चव व आरोग्याचे फायदे लक्षात घेता आता त्यांच्या उत्पादनास खूप मागणी आहे
सोबतच त्यांनी पूरन पोळी पिमिक्स देखील तयार केले या उत्पादनातही त्यांचे नाव झाले.आज केवळ जिद्द चिकाटी सातत्य व कुटुंबाचे पाठबळ यातून सौ.पल्लवी ताई ने व्यवसायात गगन भरारी घेतली आज त्यांच्या प्रीमिक्स ब्रँड चे नाव आहे.