7k Network

आयपीएल इतिहासातले दुसरे वेगवान शतक ठोकले कमी वयाच्या वैभव सूर्यवंशी ने….!

आयपीएल च्या इतिहासात एकवेळ १४ व्या वर्षी पदार्पण करत पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारा वैभब सूर्यवंशी भारताचा लंबी रेस का घोडा सिद्ध होणार हे नक्की आहे.

Oplus_0

 

IPL 2025: युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या ३८ चेंडूंत १०१ धावा शतकी झंझावातामुळे राजस्थान रॉयल्स  संघाने सोमवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यात गुजरात टायटन्स या संघावर आठ गडी व २५ चेंडू राखून एकतर्फी विजय मिळवला.

Oplus_0

सलामीवीर यशस्वी जैस्वाल (४० चेंडूंत ७० धावा) व १४ वर्षीय सूर्यवंशीने गुजरातच्या गोलंदाजांना स्थिरावू दिले नाही.

Oplus_0

बिहारच्या वैभव सूर्यवंशीने (१४ वर्ष ३२ दिवस) ‘आयपीएल’मध्ये इतिहास रचताना शतक झळकावणारा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला.

Oplus_0

आयपीएल’मधील हे दुसरे सर्वात जलद शतक ठरले.

आयपीएल’च्या सर्वात वेगवान शतकांचा विक्रम वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिास गेलच्या  नावे आहे.

वैभव सूर्यवंशीने वयाच्या पाचव्या वर्षी क्रिकेट शिकण्यास सुरुवात केली होती.

रणजी ट्रॉफीच्या गेल्या मोसमात वैभवला बिहारकडून पदार्पणाची संधी मिळाली.

वैभवने अवघे १२ वर्षे आणि २८४ दिवस वय असताना पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला.

 

त्याच वर्षी, वैभव सूर्यवंशीने बिहार क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या रणधीर वर्मा अंडर-१९ वनडे स्पर्धेत त्रिशतकही झळकावले होते.

अंडर-१९ स्पर्धेच्या इतिहासातील हे पहिले त्रिशतकही ठरले.

आयपीएल लिलावासाठी निवडलेल्या खेळाडूंच्या यादीत डावखुरा फलंदाज वैभव सूर्यवंशी ४९१व्या क्रमांकावर होता.

अनकॅप्ड खेळाडूंच्या  श्रेणीत त्याचा समावेश होता.

त्याने या वर्षी जानेवारी २०२४ मध्ये बिहारसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर सूर्यवंशीने भारत अंडर-१९ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंडर -१९ युवा कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी केली. (सर्व फोटो सौजन्य : वैभव सूर्यवंशी/इन्स्टाग्राम)

Oplus_0
Oplus_131072

 

 

 

 

 

 

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!