7k Network

वादग्रस विधाना मुळे भाजप मंत्र्या विरुद्ध रोष….!

अनेकदा वाचाळवीर नेत्या मुळे पक्षाची प्रतिमा खराब होत असते.यात काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले तर लगेच सत्ताधारी त्यांच्या वर तुटून पडतात.काँग्रेस च्या राष्ट्रभक्ती बद्दल प्रश्न  उपस्थित केल्या जाते.

ऑपरेशन सिंदूर चे श्रेय घेण्यात सत्ताधारी भाजप आय टी सेल मश्गुल असतांना आज मध्यप्रदेश च्या एका मंत्र्याने वादग्रस्त वक्तव्य केले त्यामुळे या वाचाळवीर मंत्र्या विरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला तर मध्यप्रदेश च्या जबलपूर च्या उच्च न्यायालयाने सु मोटो घेत गुन्हे दाखल करण्या चे आदेश दिले त्यामुळे  ऑपरेशन सिंदूर चे श्रेय घेण्या च्या चढाओढीत  वादग्रस्त वक्तव्याने भाजप च्या प्रयत्ना वर पाणी फेरले.

कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य अन् देशभरातून संतापाची लाट

ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल मंत्री विजय शाह यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. अशातच कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने भाजपचे कॅबिनेट मंत्री विजय शाह यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने डीजीपींना विजय शाह यांच्याविरुद्ध चार तासांत एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले असून विजय शाह यांच्याविरोधात सुमोटो दाखल करा, असे सांगितले आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत असे म्हटले की, या प्रकरणात कोणत्याही परिस्थितीत एफआयआर नोंदवला पाहिजे. उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अतुल श्रीधर यांच्या खंडपीठाने विजय शाह यांच्याविरुद्ध तात्काळ एफआयआर दाखल करावा, असे म्हटले आहे. तर मंत्री विजय शाह यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

काय म्हटल होते विजय शाह ने
भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सक्रिय सहभाग असलेल्या कर्नल सोफिया कुरेशींवर विजय शाह यांनी अप्रत्यक्षपणे भाष्य केले. विजय शाह यांनी पंतप्रधान मोदींनी “दहशतवाद्यांच्या बहिणीला लष्करी विमानातून हल्ल्यासाठी पाठवले” असे विधान केले. रविवारी इंदूरमधील महू येथील रायकुंडा गावात एका कार्यक्रमात बोलत असताना मंत्री विजय शाह यांनी वादग्रस्त विधान केलं. मंगळवारी हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांना दहशतवाद्यांची बहीण म्हटले असल्याचे सांगितले जात आहे.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!