आर्णी तालुक्या चे ठिकाण आहे येथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे.तालुक्यातील शेतकरी येथे आपले आजारी पशु घेऊन उपचारा साठी येतात पण इथले चित्र विदारक आहे
शनिवारी एक महिला आपल्या बकरी च्या पिल्लास घेऊन पशुवैद्यकीय दवाखान्यात आली त्या महिलेला १० रुपयांची चिट्ठी काढायला लावली अन औषध लिहून दिले पण उपयोग झाला नाही.अखेर ते पिल्लू तडफडत मेले.
यापूर्वी योग्य उपचार न मिळल्याने अनेक पशु धन दगावले आहेत.पशु वैद्यकीय अधिकारी येथे पशूंच्या औषधांचा व्यवसाय करतो असा आरोप असून एक मेडिकल आहे तेथून पशूंच्या उपचारासाठी औषध आणण्यास सांगितले जाते.हा प्रकार सुरू आहे पण या प्रकाराला पाठबळ कोणाचे हा प्रश्न आहे.