7k Network

रशिया चा ‘सैतान’करू शकतो कोणत्याही देशाचा विनाश…!

पहलगाम दहशतवादी हल्ल्या नंतर पाकिस्तान विरुद्ध कारवाई करत ऑपरेशन सिंदूर राबवून हवाई हल्यात पाक व्याप्त कश्मीर व पाकिस्तान मध्ये नहू ठिकाणी असलेल्या दहशतवादी स्थळ उद्धस्त केले.पाकिस्तान ने सीमा भागात गोळीबार केला व अनेक ड्रोन हल्ले केले पण ते सर्व भारता कडून निकामी करण्यात आले. दोन देशात युद्ध झाले तर अणुबाँब म्हणजे आण्विक क्षेपणास्त्र वापरल्यास मोठा अनर्थ होईल व जगाला मोठ्या जिवीत हाणीला पुढे जावे लागले असते म्हणून भारत पाक शस्त्र संधी करण्यात आली यासाठी अमेरिकेने मध्यस्थी केल्याच्या बातम्या आहे.

युद्ध म्हणजे विनाश पण प्रत्यक देश स्वतःच्या संरक्षनासाठी अस्त्र शस्त्र बाळगून असतात.

जसे भारत पाकिस्तान चे जमत नाही तसे रशिया आणि अमेरिका यांच्यात शत्रुत्व आहे.

RS-28 Sarmat’ ही मिसाइल रशियाने विकसित केलेली एक महाकाय आणि विनाशकारी बॅलिस्टिक मिसाइल आहे. याला ‘सैतान’ असे टोपणनाव देण्यात आले असून, ही मिसाइल जगात कुठल्याही ठिकाणी अणुबॉम्बने हल्ला करण्याची क्षमता ठेवते.

या क्षेपणास्त्राची कमाल मारक क्षमता जवळपास १८,००० किलोमीटर असल्यामुळे रशिया जर इच्छित असेल तर कोणत्याही देशावर थेट त्याच्या भूमीतून प्रचंड नाशक हल्ला करू शकतो. ही मिसाइल जवळपास २०८ टन वजनाची असून तिची लांबी ३५ मीटर इतकी आहे.

 

विशेष म्हणजे या मिसाइलमध्ये एकाच वेळी १५ अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेली ही मिसाइल केवळ भौगोलिक अंतरावर विजय मिळवतेच, पण शत्रूच्या मिसाइल डिफेन्स सिस्टमला चकवून आपलं लक्ष्य अचूकपणे भेदू शकते. त्यामुळेच ती अत्यंत धोकादायक मानली जाते.

या मिसाइलच्या निर्मितीमागे रशियाचा एक प्रमुख उद्देश म्हणजे अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्यापासून स्वतःचे संरक्षण करणे हा आहे. म्हणजेच ही मिसाइल ‘डीटेरन्स स्ट्रॅटेजी’ म्हणजे प्रतिकारशक्ती म्हणून काम करते. ही मिसाइल जर रशियाकडे आहे, हेच शत्रूपक्षाला धडकी भरवणारे ठरते.

अमेरिकन बाजारमूल्यानुसार या मिसाइलची किंमत सुमारे ३५ मिलियन डॉलर इतकी आहे, तर भारतीय रुपयांमध्ये याचा खर्च जवळपास २९० कोटींचा आहे. या मिसाइलच्या विकसनामुळे रशिया आता आणखी सामरिकदृष्ट्या मजबूत आणि खतरनाक राष्ट्र म्हणून पुढे आले आहे.

 

जगातील राजकीय व सामरिक तणाव पाहता, अशा प्रकारच्या क्षेपणास्त्रांची भूमिका केवळ युद्धातच नाही, तर युद्ध टाळण्यामध्ये सुद्धा महत्वाची ठरते. म्हणूनच ‘सैतान २’ ही मिसाइल जगातील सर्वात भयावह आणि सामरिकदृष्ट्या प्रभावी अस्त्र मानली जाते.

Oplus_131072

 

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!