राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जेष्ठ कार्यकर्ते असलेल्या एकानेव त्याच्या कुटूंबाने आपल्या सुनेचा हुंड्या साठी अमानवीय छळ केला व परिणामी त्याच्या सुनेने आपली जीवनयात्रा संपवली….. याबाबत सविस्तर वृत्त असे की
पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुळशीतील पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि मुलगा हे सून वैष्णवी हागवणेच्या आत्महत्येनंतर फरार आहे. वैष्णवीचा हुंड्यासाठी अमानुष छळ केल्याचा सासरे राजेंद्र हगवणेसह सासू, पती, दिर आणि नणंद यांच्यावर आरोप आहे. प्रेम विवाहावेळी सून वैष्णवीच्या माहेराकडून ५१ तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी घेण्यात आली होती. तर जमीन खरेदीसाठी २ कोटींच्या मागणीचा तगादा लावला होता, दोन कोटी रूपये न दिल्याने पती शशांकने धमकी देखील दिली होती. त्याचबरोबर तो चारित्र्यावरून संशय ही घेत होता. वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक छळ केल्यानं राजेंद्र हगवणेंची लहान सून वैष्णवी हागवणे हीने घरात गळफास घेऊन जीव दिला. या घटनेनंतर आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. फरार आरोपी हे अजित पवार गटाच्या समंधित असल्याने पोलीस कारवाईस टाळाटाळ करत असल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकाच्या वतीने करण्यात आला.