शांत असलेल्या भारताला डीवचण्या चे काम पाकिस्तान नेहमीच करत असतो काही दिवसांपूर्वी कश्मीर मधील खोऱ्यातील पहलगाम येथील पर्यटनस्थळी आलेल्या २८ भारतीयांना गोळीबार करत ठार केले.
त्यानंतर देशभर पाकिस्तान विरोधात संताप निर्माण झाला.त्यामुळे जनभावना लक्षात घेत भारत सरकारने पाकिस्तान ला चोख उत्तर देण्याची भूमिका घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा,संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बैठकी वर बैठका घेतल्या व नंतर पाक वर ऑपरेशन सिंदूर राबवून हवाई हल्ले केले त्यात ९ दहशतवादी तळ नष्ट करून १०० च्या वर दहशतवादी ठार केले.अजूनही हे ऑपरेशन सिंदूर थांबले नाही असे सांगितल्या जाते.यापुढे कुठलाही पसकीस्थांनी दहशतवादी हल्ला युद्ध मानल्या जाईल असे भारताने बजावले आहे. दहशतवादाची झळआता पाकिस्तान ला बसू लागली आहे. आज एका बॉम्ब स्फोटात ४ विद्यार्थी व काही सैनिक मारल्या गेले ते म्हणतात ना पेरले तेच उगवते अशी गत पाकिस्तान ची झाली आहे.
गेल्या काही दिवसापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. भारतानेपाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. पाणी सुरू करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे. दरम्यान, आता पाकिस्तानमध्ये सिंधू नदीच्या पाण्यासाठी गोंधळ सुरू असल्याचे समोर आले आहे.
पाकिस्तान सरकारने सिंधू नदीवर ६ कालवे बांधण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. हे कालवे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात बांधले जातील आणि त्यामुळे सिंध प्रांतात संताप आहे. या प्रकल्पाद्वारे पाकिस्तान सरकार पुन्हा एकदा भेदभाव करण्याची तयारी करत असल्याचा आरोप सिंध प्रांतातील लोकांनी केला आहे. फक्त पंजाब-केंद्रित धोरणे का बनवली जातात या मुद्द्यावरून पाकिस्तानातील सिंध, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये आधीच बंडखोरीच्या घटना घडल्या आहेत.