क्रिकेट सामन्यात खेळाडू मधील वाद नवा नाही अनेकवेळा हा वाद हाणामारी पर्यंत पोहचला असल्याचे पहायला मिळते. असा वाद झाल्यावर पंच अथवा इतर खेळाडू मध्यस्थी करतात. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळ शिस्त भंग केल्याची कारवाई करू शकतात.
लखनऊच्या एकाना स्टेडियमवर झालेल्या लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठी (Abhishek Sharma Digvesh Rathi Fight) यांच्यात जोरदार वाद झाला होता. दिग्वेश राठी याने जेव्हा अभिषेक शर्माला याला आऊट केल्यानंतर अतरंगी दिग्वेशने अभिषेक शर्माला माघारी जाण्याचा इशारा केला. त्यामुळे अभिषेक चांगलाच संतापला होता. अभिषेकने २० चेंडूत ५९ धावांची धडाकेबाज खेळी केली होती.