प्रेरणा दिव्यांग समिती ची कार्यकारिणी जाहीर
दिव्यांगाच्या न्याय हक्कासाठी लढणार
यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दिव्यांगाची संख्या असून विकासापासून कोसो दूर असल्याचे लक्षात येते.
त्यांना सामाजिक आर्थिक सर्वागीण पाठबळ देणे गरजेचे आहे.
त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याची गरज असल्याचे कळते
त्यांच्या तील सुप्त कलागुणांना व्यासपीठ निर्माण करून देणे आवश्यक आहे.
ही बाब लक्षात घेऊन डॉ विष्णू उकंडे यांनी प्रेरणा दिव्यांग समितीची स्थापना केली आहे.
या प्रसंगी त्यांनी संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक गावात दिव्यांग समिती स्थापन करणार असल्याचे सांगितले.
या प्रसंगी त्यांनी जिल्हा अध्यक्ष घनश्याम बनसोड सल्लागार नानेश्वर कुडवे तर आर्णी तालुका अध्यक्ष चंदुसिंग जाधव व मारुती राठोड सावळी,लोणबेहळ विभाग तर शहर अध्यक्ष दीपक गोडवे ,चांद भाई बोरगाव भंडारी विभाग तालुका उपाध्यक्ष प्रशांत शिंदे,लोणबेहळ सुकळी विभाग उपाध्यक्ष साहेबराव टाले सावळी इचोरा विभाग उपाध्यक्ष प्रशांत भांगे जवळा लोणी विभाग विभाग सचिन राठोड तर महाळुंगी विभाग अध्यक्ष विजय राठोड महिला प्रतिनिधी कल्पना जाधव व उषा देवकर यांची नियुक्ती केली असून लवकरच संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकारणी घोषित करणार असल्याचे संस्थापक डॉ विष्णू उकंडे यांनी सांगितले आहे