१५ आगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्ताने आर्णी तालुक्यातील उमरी इजारा येथील महिला ,पोलीस पाटील यांनी एक आदर्श घालून दिला असून सौ.अंबिका जयंत वानखडे यांनी त्यांना मिळालेल्या मानधनाच्या रकमेतून शालेय विध्यार्थी यांना नोट बुक पेम व शालेय साहित्याचे वाटप केले.
गावातील प्राथमिक जिल्हा परिषद मराठी शाळेत विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केले व आपल्या सामाजिक जाणिवेचा परिचय दिला.
शाळा सुधार समितीचे अद्यक्ष विनोद राठोड,सरपंचा शालिनी वाकोडेग्रामपंचायत सदस्य अमोल जाधव,शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख आश्विनी ताई देशमुख, व सर्व शिक्षक मुख्याद्यापक,देवानंद आडे,कैलास राठोड,रंधन जाधव, बाळू राठोड,उत्तम वानखडे,गौतम कांबळे,अर्जुन घाटबडवे व गावकरी उपस्थित होते.