आर्णी येथील ब्रेन वेव SIP Abacus विद्यार्थ्यांची गगनभरारी
आर्णी
नागपूर येथे झालेल्या SIP Abacus Regional Prodigy 2025 या प्रादेशिक स्पर्धेत विदर्भातील विविध तालुक्यांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. या स्पर्धेत आर्णी येथील ब्रेन वेव SIP Abacus इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करीत आर्णी शहराचा मान उंचावला.स्पर्धेत ज्युनियर गटासह फाऊंडेशन लेवल 1, 2 व 3 मध्ये आर्णीच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कमी वेळेत कठोर परिश्रम करून हे यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल SIP Abacus आर्णीचे संचालक अनिकेत कोळसे पाटील, आरती कोळसे पाटील, शिक्षिका मोनिका नामदेववार, कस्तुरी पावडे तसेच सर्व पालकांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय पालक,शिक्षक व संपूर्ण SIP Abacus टीम आर्णीला देत आनंद व्यक्त केला.
ज्युनियर गटातील विजेते :
विनायक किशोर भोयर
शुरभी आशिष कदम
प्रियल राजू राऊत
फाऊंडेशन लेवलनिहाय निकाल :
लेवल 1 : अवंति सुमेध बागेश्वर – द्वितीय क्रमांक, वीर अनंता खोडे – तृतीय क्रमांक
लेवल 2 : आरूश दीपक गायकी – तृतीय क्रमांक
लेवल 3 : क्रांती आशिष भोयर – द्वितीय क्रमांक, ग्रीष्मा प्रविण देशमुख – तृतीय क्रमांक