सक्खा भाऊ पक्का वैरी ही म्हण आहे.रक्ताची नाते किरकोळ भांडणात कसे मातीमोल होतात व होत्याचे नव्हते कधी होऊल सांगता येत नाही. नाते टिकवण्यासाठी क्रोधा वर नियंत्रण आवश्यक असते. एका भवाने किरकोळ वादातून दुसऱ्या भावाची हत्या केली हा खळबळजनक प्रकार महागाव तालुक्यात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, माळकिन्ही येथील प्रदीप अशोक रिंगे (वय ३०) हा आपल्या शेतात काम करीत असतांना त्याचा मोठा भाऊ निलेश अशोक रिंगे (वय ३५) याच्याशी शेतातील मुगाच्या शेंगा तोडण्याच्या कारणावरून वाद झाला. वाद चिघळताच प्रदीपने मानसिक तणावातून बांबूची काठी उचलून आपल्या सख्या भावांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर जबर तडाखे दिले. या गंभीर मारहाणीमुळे निलेश रक्तबंभाळ होऊन अतिशय वेदना झाल्याने त्याचा जागेवरच कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. सख्ख्या भावाने आपल्या भावाचा शेतात खून केल्याची वार्ता वाऱ्यासारखी परिसरात पसरली त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच महागाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आरोपी प्रदीप रिंगे याला ताब्यात
घेण्यात आले आहे. मयत निलेश रिंगे याचे शव उत्तरीय तपासणीसाठी सवना ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनराज निळे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास चालू आहे. भावानेच सख्या भावाचाच खून केल्याच्या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. मृतकाच्या पश्चात आई-वडील पत्नी आणि तीन वर्षाची एक मुलगी असा परिवार आहे. नात्यांतील प्रेम व आपुलकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या ह्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.