ठाणेदार निलेश सुरडकर यांच्या प्रयत्नाने शांतता समितीची सभा येथील माहेर मंगल कार्यालयात पार पडली
आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत माहेर मंगल कार्यालय येथे शांतता समितीची सभा घेऊन कायदा व सुव्यवस्था अबधीत राखण्याचे दृष्टिकोनातून शांतता सभा घेण्यात आली यावेळी सर्व सण व उत्सव धार्मिक एकोपा राखून उत्साहात साजरे करा असे मत दारव्हा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांनी व्यक्त केले.
आर्णी दि. २५/०८/२०२४ रोजी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे उपविभागीय अधिकारी दारव्हा यांच्या मार्गदर्शनाखाली आर्णी प्रशासकीय अधिकारी तहसीलदार वैशाख वाहूरवाघ. नगरपरिषद मुख्याधिकारी रवींद्र राऊत उपविभागीय अभियंता एम एस ई बी प्रवीण फुलझले
इतर प्रशासकीय अधिकारी तसेच शांतता समिती सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष सदस्य, पोलिस पाटील,पोलीस मित्र, पत्रकार बंधू, गणेश उत्सव अध्यक्ष सदस्य, दुर्गा उत्सव अध्यक्ष सदस्य यांची आगामी सण उत्सव श्री.गणेश उत्सव, ईद-ए-मिलाद, दुर्गा उत्सव संबंधाने धार्मिक सलोखा व सामाजिक ऐक्य तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून शांतता समिती सभा घेण्यात आली
सभेमध्ये उपविभागीय अधिकारी यांनी सर्व गणेश मंडळ यांनी पारंपारिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा करावा तसेच ईद-ए-मिलाद आयोजक यांनी सुद्धा डी.जे न लावता पारंपारिक पद्धतीने
ईद-ए-मिलाद ची मिरवणूक काढावी
करिता दिले आहवान कायद्याचे उल्लंघन केल्यास सखोल चौकशी करून कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल याचीही दक्षता घ्यावी यावेळी समस्त शासनाचे अधिकारी मंचावर उपस्थितीत होते