7k Network

लेकीं च्या खेळासाठी पित्याने सोडला व्यवसाय सोडले गाव…!

मुला मुलींच्या शिक्षणासाठी गाव सोडून शहरात राहणारे अनेक पालक आपण पहातो.पण आपल्या मुलीची खेळाची आवड पाहून वडिलांनी तिच्यावर बालवयात संस्कार तर केले सोबत स्वतः प्रशिक्षण दिले
ज्ञानेश्वर पिसरवार हे व्यायामा ची आवड असलेले युवा व्यक्तिमत्त्व त्याचा शिवनेरी चौकात आर्णी येथे हॉटेल व्यवसाय आहे बऱ्यापैकी या व्यवसायात त्यांचा जम बसलेला
पण मुलगी कु प्रिया सकाळी वडिलां सोबत धावायला लागली तिच्या तील आवड पाहून तिला वडिलांनी पोहण्याचे धडे दिले दोन्ही हात बांधून ती पोहण्याचा सराव करत होती.सोबत ती सायकलिंग सुद्धा तरबेज झाली.
आपल्या मुलीची खेळातील आवड पहाता वडील नाना ज्ञानेश्वर पिसरवार याने तिला अमरावती सारख्या शहराची निवड केली जेथे सुप्रसिद्ध हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आहे.येथे प्रशिक्षण मिळेल या अपेक्षेने वडिलांनी गाव व व्यवसाय सोडला अनोळखी शहरात नवी सुरवात केली
मुलगी प्रिया ही देखील परिश्रम घेत आता चमकू लागली.

क्रीडा सायकलिंग स्पर्धेमध्ये कु..प्रिया पिसरवार ने पटकविला पहिला नंबर

आर्णी सायकलिंग क्लब ची सदस्य कुमारी प्रिया पिसरवार चा अमरावती येथे झालेल्या क्रीडा सायकल स्पर्धेमध्ये पहिला नंबर

क्रीडा युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती सायकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ह्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन दी. /२५/ अगस्ट रोजी करण्यात आले होते

जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेत कु. .प्रिया ज्ञानेश्वर पिसरवार आर्णी यवतमाळ ईने जिल्ह्यातून सायकलिंग स्पर्धेमध्ये पठकविला अहवंल नंबर

आर्णी सहरा तील रहिवाशी ज्ञानेश्वर पिसरवार यांची कन्या कु..प्रिया पिसरवार हिला लहानपणापासूनच सायकलिंगचे छंद होते शिक्षणासोबतच ती सतत सायकल चालवत राहायची वडिलांच्या सामान्य परिस्थितीतून तिने शिक्षण घेता वेळी मनात उच्च विचार ठेवून अनेक वेळा विविध सायकलिंग क्रीडा स्पर्धेत सायकल चालून पुरस्कार मिळविले आहे अमरावती जिल्ह्यात झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये आज ही तिने सहभाग घेऊन चिकाटीने सायकल चालूवुन पहिला क्रमांक पठकविला आहे अमरावती जिल्ह्यातील सायकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या क्रीडा स्पर्धेमध्ये विविध तालुक्यातील शाळेकरी मुला-मुलींनी सहभाग नोंदविला होता नांदगाव पेठ मोर्शि रोडवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते असंख्य मुलांना वगळून कुमारी प्रियाने पहिला क्रमांक गाठला आहे त्याकरिता कुमारी प्रिया ज्ञानेश्वर पिसरवारचे शहरात नव्हे तर संपूर्ण तालुक्यात जिल्ह्यातही नागरिकांचे तिच्यावर कौतुकाची वर्षा होत आहे

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!