कोसदनी येथे धाडसी घरफोडी…
रोख रक्कमे सह लाखोंचे दागिने घेऊन चोरटे लंपास…
आर्णी :-
तालुक्यातील कोसदनी येथील ग्राप पंचायतचे संगणक डाटा ऑपरेटर असलेले विनोद भगवान ठाकरे यांच्या घरी ता ८ जुलै च्या मध्ये रात्री अज्ञात चोरटय़ांनी घरफोडुन रोख रक्कम सह सोन्या चांदिचे दागिने व मोबाईल घेऊन पसार झाले..
सविस्तर वृत्त असे कि विनोद ठाकरे हे ता ८ जुलै रोजी शेतातील कामे आटोपून सायंकाळी घरी आले. जेवन करून घरातील सगळे जण झोपी गेले. मध्य रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटय़ांनी त्यांच्या घराचे लोखंडी फाटकाला असलेले कुलूप फोडुन स्वयंपाक घरात शिरले तीथे अ आलेले कपाट फोडुन त्यातील रोख वीस हजार रुपये, तसेच पाच तोळे सोळे सोडण्याचे दागिने तसेच चांदीची भांडी व मोबाईल असा लाखो रूपयांचे ऐवज लंपास केले.
सुदैवाने जीवीत हानी करण्यात आली नाही.
तसी तक्रार आर्णी पोलिस स्टेशन मध्ये दिली असून सदर घटणेची मोका तपासणी करण्यात आली आहे. लवकरच चोरट्यांचा शोध घेऊ असे आर्णी पोलीसांनी आश्वास्त केले आहे..
