7k Network

समाजाचा विकास आणि विरासत हेच माझे ध्येय…ना.संजयभाऊ राठोड

 

समाजाचा विकास आणि विरासत हेच माझे ध्येय.. ना.संजय भाऊ राठोड पालकमंत्री यवतमाळ जिल्हा

कासारखेड ( जि. अकोला) येथे महाराष्ट्र गोर बंजारा सेवा संघाच्या वतीने बंजारा समाजाचे श्रद्धास्थान, हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री महानायक वसंतरावजी नाईक साहेबांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम तसेच गावातील विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहून समाज बांधवांशी  यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय भाऊ राठोड यांनी संवाद साधला.

गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या सभामंडप आणि जलसंधारण विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या नाला खोलीकरण कामाचे यावेळी लोकार्पण ना.राठोड यांनी केले.

राज्याचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते, बंजारा समाजाचे श्रद्धास्थान वसंतराव नाईक साहेबांनी रोजगार हमी सारखी योजना आणून लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला, हरित क्रांतीच्या माध्यमातून देशाला अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर केले. पुढे दुष्काळाशी लढण्यासाठी माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक साहेबांनी स्वतंत्र मृद व जलसंधारण विभागाची स्थापना केली, ज्यातून शाश्वत शेतीची आणि जलसमृद्ध महाराष्ट्राची वाट मोकळी झाली. त्यांनीच दाखवलेल्या वाटेवर चालण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. असे मनोगत ना.संजय भाऊ राठोड यांनी व्यक्त केले.

काहीजण म्हणतात, श्री क्षेत्र पोहरादेवी येथे केलेल्या विकासाने आणि मंदिर बांधल्याने प्रश्न सुटणार आहे का? पण मी स्पष्ट सांगतो समाजाचं स्थान, आत्मसन्मान आणि सांस्कृतिक ओळख जपणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आजवर समाजाचे जवळपास १९ प्रश्न मी मार्गी लावले आहेत, आणि उर्वरितही निश्चितच मार्गी लावणार आहे. टीका करून नव्हे, तर कृतीतून विश्वास निर्माण करण्यावर माझा भर असून समाजाचा विकास आणि विरासत जपण्यास मी कटिबध्द आहे. असे अभिवचन यावेळी ना.संजय राठोड यांनी समाज बांधवांना दिले.

आज या गावातील ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला आमंत्रित करून केलेल्या आदरपूर्वक स्वागत आणि सन्मानाबद्दल आभार मानतो.असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी ज्येष्ठ नेते मा.जीवनदादा पाटील,महाराष्ट्र गोरबंजारा सेवा संघाचे महासचिव जयकिसनजी राठोड, वाशिम जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीपराव जाधव, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासभाऊ राठोड, गोरसेनेचे विदर्भ अध्यक्ष मनोहर राठोड, बार्शी टाकळीचे मंडळ अध्यक्ष गोपाल महल्ले, प्रमोद चव्हाण, पिंजर भाजपचे मंडळ अध्यक्ष संकेत राठोड, संत सेवालाल बंजारा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य डॉ. मधुकर पवार, बार्शी टाकळी पंचायत समितीचे माजी सभापती महादेवराव जाधव, महाराष्ट्र गोर बंजारा सेवा संघ, अकोला जिल्हा अध्यक्ष अजबराव जाधव, माजी प्राचार्य भरतभाऊ राठोड, महाराष्ट्र गौरव बंजारा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव राठोड, नायक रोहिदास राठोड, कारभारी साहेबराव चव्हाण, समाजसेवक गजानन ठोकळ आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!