रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता अरुंद करून ठेवल्या विरोधात आर्णी च्या सिसोदिया ले आऊट,गोडवे ले आऊट च्या नागरिकांनी निवेदन दिले मोर्चा काढला अन शेवटी उपोषणाचा मार्ग अवलंबला या उपोषणास प्रचंड प्रतिसाद मिळाला येथे सर्व पत्रकार स्थानिक नेत्यांनी भेट देत समर्थन दिले होते. उपोषणास वाढते समर्थन पाहून आर्णी नगरपरिषद ने दखल घेत मुख्याधिकारी रवींद्र राऊत यांनी तातडीने नकाशा नुसार रस्त्याची मोजणी करून अतिक्रमण धारकास नोटीस बजावली कायदेशीर बाबी पाहून सात दिवसात अतिक्रमण न काढल्यास नगरपरिषद कारवाई करून अतिक्रमण काढेल असे नोटीसीत म्हटले आहे.
अतिक्रमण काढल्याशिवाय, डीपी काढल्याशिवाय, उपोषण उठणार नाही
असी भुमिका आज घेण्यात आली.
तर मुख्याधिकारी यांनी संबधित अधिकार्याला आनून मोजणी केली.
अतिक्रमण धारकाला नोटीस दीली,तथा जागा(बाॅन्ड्री) आखून दीली.
तथा
सात दीवसाची मुदत दीली,
सात दीवसात अतिक्रमण काढले नाही तर मशिन लावून आम्ही स्वत अतिक्रमण पाडू असे मुख्याधिकारी यांनी अतिक्रमण धारकाला,बजावले ।।सांगितले।।।