सैय्यद जाकीर हुसैन – सेवाभावी पत्रकारितेचा एक तेजस्वी चेहरा.
आर्णी: समाजात परिवर्तन घडवायचं असेल, अन्यायाविरोधात आवाज उठवायचा असेल, तर पत्रकारिता ही एक प्रभावी माध्यम ठरते. याच पत्रकारितेला सामाजिक बांधिलकीची जोड देत दैनिक म-मराठी चे संपादक सैय्यद जाकीर हुसैन यांनी लेखणीच्या माध्यमातून समाजाला नवा दृष्टिकोन देण्याचे काम सातत्याने केले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे योगदान स्मरणात ठेवावे, हेच त्यांच्या कार्याचे यथार्थ मूल्यमापन ठरेल.
सैय्यद जाकीर हुसैन हे केवळ पत्रकार नाहीत, तर ते एक चळवळीचे नेतृत्व करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी आपल्या लेखनातून नेहमीच उपेक्षित, शोषित, वंचित समाजघटकांच्या वेदनांना शब्दरूप दिले. अन्याय, अत्याचार, सामाजिक विषमता आणि भ्रष्टाचाराविरोधात निर्भीडपणे लिहित राहिले. त्यांच्या बातम्यांमधून केवळ माहितीच नव्हे, तर जागृतीचा आणि परिवर्तनाचा संदेश उमटत असतो.
दैनिक म-मराठी हे केवळ एक वृत्तपत्र न राहता, समाजातील सामान्य माणसाच्या भावना, संघर्ष आणि आशा-अपेक्षांचे व्यासपीठ ठरले आहे. बोलमहाराष्ट्र