“प्रशासकीय अनुभवांचे शाळेत दर्शन – विद्यार्थ्यांनी घेतली केंद्रप्रमुखांची मुलाखत”..
दि.७ जुलै,२०२५
साने गुरुजी विद्यामंदिर,नगर परिषद शाळा क्रमांक ७,यवतमाळ येथे आज विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी व माहितीपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.नगर परिषद यवतमाळ येथील केंद्र क्रमांक ३ चे केंद्रप्रमुख राजेंद्र मेनकुदळे सर यांची विद्यार्थ्यांनी थेट मुलाखत घेतली.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संवादकौशल्य,आत्मविश्वास आणि जिज्ञासा वाढवणे हा होता. विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीपासून ते प्रशासनातील अनुभवांपर्यंत विविध प्रश्न विचारले.मेनकुदळे सरांनी अतिशय सहज पद्धतीने विद्यार्थ्यांचे समाधान केले व त्यांना पुढील शिक्षणासाठी मौल्यवान मार्गदर्शन केले.
हा उपक्रम शाळेतील उपक्रमशील शिक्षिका भाग्यश्री धोत्रमपल्ली यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला.शाळेच्या मुख्याध्यापिका आराधना बेनकर यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून त्यांचे कौतुक केले व अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो,असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षिका वंदना उईके,राजू कुडमेथे,जयश्री चव्हाण,कल्याणी देशकर यांनी विशेष मेहनत घेतली.