काल विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सभागृहातील कार्यकाळ संपला म्हणून वरिष्ठ सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभात प्रचंड राजकीय टोलेबाजी व कोपरखळी पहायला मिळाली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबादास दानवे हे सर्वसाधारण कुटुंबातून आले ते काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाही असे म्हटले त्यावर शिवसेना उबाठा प्रमुख आमदार उद्धव ठाकरे यांनी जरी सोन्याचा चमचा घेऊन अंबादास जन्माला आले नसले तरी त्यांनी भरल्या ताटाची प्रतारणा केली नाही असा टोला लगावला.
२०२९ पर्यंत उद्धवजी आम्हाला विरोधात बसण्याची वेळ नाही पण तुम्हाला मात्र इकडे(सत्ताधारी बाकावर)बसण्यासाठी “स्कोप” आहे तसे असेल तर आपण त्याचा वेगळा विचार करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तसेही शिवसेना आमचा मित्र पक्ष आहे असेही ते म्हणाले
मुख्यमंत्री स्कोप म्हणाले त्यावरून नव्या राजकीय समीकरना ची “होप” असण्याची चर्चा सुरू झाली आहे.
राजकारणात सत्ता मिळवणे हे प्रत्येक राजकीय पक्षांचे ध्येय असते अशा वेळी प्रत्येकाला सत्तेची होप असते.कालच मुंबई महा नगरपालिका व राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पहाता शिवसेना (एकनाथ शिंदे) व रिपब्लिकन सेना (आनंदराज आंबेडकर)यांच्या सेनेची अधिकृत युती झाल्या ची घोषणा केली.