घोषणा केल्या प्रमाणे मराठा आंदोलक,संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे काल गणेश स्थापणे च्या दिवशी अंतरवली सराटी येथून मुंबई कडे निघाले त्यापूर्वी त्यांनी गणेश मूर्ती चे पूजन केले व छत्रपती शिवरायांना अभिवादन केले.आज मनोज पाटील किल्ले शिवनेरी वर जाऊन शिवरायांच्या समोर नतमस्तक होतील व पुढे मुंबईला प्रयाण करतील.
मनोज पाटील मुंबई पोहचण्या पूर्वी आझाद मैदानावर हजारो मराठा आंदोलक पोहचले आहेत.हजारो गाड्या व त्यात सुमारे महिना भर पुरेल एव्हढे स्वयंपाक साहित्य त्यांनी सोबत आणले आहे.आझाद मैदानात स्वयंपाक करण्यास पोलिसांनी मनाई केली व एकाच दिवसाची आंदोलनास परवानगी असतांना आंदोलक मात्र आक्रमक असून आरक्षण घेतल्या शिवाय आता मुंबई सोडणार नाही असा निर्धार देखील आंदोलक व्यक्त करत आहेत. सरकार च्या वतीने आज शिस्टमंडळ मनोज पाटलांना भेटण्यासाठी येईल असा अंदाज असून त्यांच्या सोबत काय चर्चा होते याकडे लक्ष लागले आहे.
अरक्षणा ला एकादिवसाची परवानगी देता मग एका दिवसात आरक्षण द्या असे मनोज पाटील जरांगे म्हणाले.