संपला पोळा पाऊस झाला भोळा असे म्हणतात पण गणेशाचे आगमन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आर्णी शहर व तालुक्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले सुमारे तास भर पडलेल्या मुसळधार पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. यावेळी वेगवान वारे वाहू लागल्याने आर्णी पोलीस स्टेशन परिसरातील एक मोठे लिंबाचे वृक्ष उन्मळून पडले यात काही दुचाकी चे नुकसान झाले मात्र यात कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही.
मात्र आज पावसा सोबत विजांचा प्रचंड कडकडाट झाला यात तालुक्यातील देऊरवाडी बुटले येथील एक श्रमिक बकऱ्या चारत असतांना वीज पडून त्याचा जागीच मृत्य झाला.तर इतर दोन इसम जखमी झाले.
अहेमद जब्बार खान असे मृतकाचे नाव असून त्यांचे वय अंदाजे ४५ वर्षे आहे.पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून याबाबत ची माहिती नायब तहसिलदार उदय तुंडलवार यांनी प्रशासनास कळवली असून मृतका चे शवविच्छेदन करण्यासाठी आर्णी ग्रामीण रुग्णालयात पार्थिव आणण्यात आले आहे.मृतक हा गरीब असून त्याच्या कुटुंबास शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी होत आहे.