आर्णी शहरात मोकाट जनावरांचा मोठा हैदोस असतो सुमारे एका दोन महिन्यांपूर्वी मोकाट घोड्यांनी अनेकांना जखमी केली.तालुक्यातील लोणी येथील एका दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीला मोकाट घोड्या च्या धडकेने आपला जीव गमवावा लागला होता. कितीतरी लोक जखमी झाले.मोकाट कुत्रे व मोकाटअश्व घोडे यावर नगरपरिषद प्रशासनाने कारवाई करावी अशी नागरिक नेहमीच मागणी करतात पण नगरपरिषद प्रशासन कुठलीही कारवाई करत नाही.
आज येथील ग्रीन पार्क परिसरात एका लहान मुलाला बेफान झालेल्या मोकाट घोड्याने लाथ मारली त्यात वरद इंगळे नावाचा मुलगा जखमी झाला.
तसेच नंदनवन कॉलनी परिसरातील एका शिक्षकास घोड्याने हल्ला करत जखमी केले.
एकाच दिवशी घडलेल्या दोन घटना मुळे आर्णीकर नागरिक संतापले आहेत.आता तरी नगरपरिषद प्रशासनाचे डोळे उघटतील का हा प्रश्न आहे.
गल्लोगल्ली मोकाट कुत्रे देखील आर्णी च्या नागरिकांत दहशत निर्माण करत आहेत.
