आर्णी तालुक्यातील अनेक गावांत मुसळधार पावसामुळे नाल्यास पूर आला.अतिवृष्टी ची परिस्थिती लक्षात घेऊन शिवसेना यवतमाळ उपजिल्हाप्रमुख डॉ.विष्णू उकंडे यांनी चिखली (ई)या गावास भेट दिली.त्यावेळी
चिखलीच्या नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर येऊन पुलावरून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने परिसरातील विद्यार्थी रात्री ७ वाजेपर्यंत शाळेत अडकून पडले असता उपजिल्हा प्रमुख शिवसेना डॉ विष्णू भाऊ उकंडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास मदत केली तथा प्रशासनास कायम स्वरूपी उपाय योजना करण्या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली यावेळी मुख्याध्यापक खरतडे सर शिक्षण समिती सदस्य,व अनिल नागमोते तथा गावकरी उपस्थित होते. डॉ.विष्णू उकंडे हे सतत शेतकरी, शेतमजूर, महिला,कामगार यांच्या प्रश्नावर काम करत असतात.
