आर्णी पोलीस स्टेशन हद्दीत अनेक गंभीर गुन्हे गेल्या काही दिवसात घडले पण त्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करून आर्णी चे ठाणेदार केशव ठाकरे व त्यांच्च्या सहकारी अधीकारी कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.सराफा व्यापाऱ्यांस लुटीचे प्रकरण असो की घरफोडी, खुनाची घटना सर्वच प्रकरणाचा छडा लावत कायदा व सुव्यवस्था चांगल्या रीतीने हाताळनारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख सिद्ध होत आहे.नुकताच आर्णीत दोन ठिकाणी घरफोडी च्या घटना झाल्या होत्या त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित होऊ लागल्या होत्या पण केशव ठाकरे यांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत या गुन्ह्यातील आरोपींना अटक करून त्यांच्या कडील चोरलेला व चोरीलागेलेला मुद्देमाल जप्त केला. जुलै महिन्यात सुद्धा चोरी व घरफोडी च्या घटना घडल्या होत्या त्यात देखील अटक केलेल्या आरोपींचा समावेश होता.५ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केल्याने या मोठया कारवाई चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड,उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार याच्या मार्गदर्शनात आपण कारवाई व तपास करत असतो असे ठाणेदार केशव ठाकरे म्हणतात.
