7k Network

संसद घुसखोरी प्रकरणी ललित झा दिल्ली पोलिसांना शरण

संसद हल्ल्याच्या वर्षपूर्तीला केली होती घुसखोरी

संसद भवनात घुसखोरी करण्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार ललित झा गुरुवारी दिल्ली पोलिसांना शरण आला. बुधवारी झालेल्या या घुसखोरीनंतर तो फरार होता.

पोलिस त्याचा शोध घेत असतानाच गुरुवारी रात्री तो स्वतःहून दिली पोलिसांना शरण आला.

संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी एका महिलेसह चौघांना बुधवारी अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर दहशतवादविरोधी कायदा यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, भारतीय दंड संहितेअंतर्गत आणखीही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ललित झा हा बुधवारपासून फरार होता. गुरुवारी ललित एका अन्य व्यक्तीसोबत कर्तव्य पथ पोलिस ठाण्यात पोहोचला आणि त्याने शरमागती पत्करली. त्यानंतर त्याला स्पेशल सेलमध्ये पाठवण्यात आले.

ससन २००१च्या संसदेवरील हल्ल्याला बुधवारी २२ वर्षे पूर्ण झाल्याच्या दिवशीच सागर शर्मा आणि मनोरंजन डी या दोघांनी लोकसभेतील प्रेक्षक गॅलरीमधून लोकसभेच्या सभागृहात उडी मारली होती. तसेच, घोषणाबाजी करून नळकांडीतून पिवळा धूर सोडला होता. खासदारांनी या दोन तरुणांना लगेचच पकडून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केले होते.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!