संतापजनक
२५०००० लाखात रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना
तीन वर्षाच्या मुलाची विक्री आपल्या मुलाला विकण्याचा प्रकार घडला आर्णी तालुक्यातील कोपरा येथील पुष्पा श्रावण देवरे या २७ वर्षीय विवाहित महिलेने माझ्या ३ वर्षीय मुलाची विक्री त्याच्या बापानेच केली अशी फिर्याद जिल्हापोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड यांच्याकडे दिली यावरून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आर्णी पोलिसांना याची माहिती दिली.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आर्णी पोलीस स्टेशन चे ठाणेदार केशव ठाकरे यांनी तपासाचे चक्रे फिरवत फक्त १४ तासाचे आत
तेलंगणा राज्यातून आदीलाबाद जिल्ह्यातुन ३ वर्षाच्या जय ला
आर्णी पोलिसांनी सुखरूप सोडविले..
आणि ३ आरोपींना अटक करण्यात आली
यामुळे एक आंतरराज्य मानव तस्करी चा आर्णी पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात भांडाफोड केला अधिक तपास सुरू आहे.