दिग्रस-दारव्हा-नेर चे कृतिशील लोकप्रतिनिधी व राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री आणि वाशिम यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजय राठोड हे मतदान संघाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच विविध योजनेतून मोठया प्रमाणात विकास कामे करत असतात.
वैशिष्ट्येपूर्ण योजना,महानगरोतथान,जिल्हास्तर योजनेतूनअंबिका नगर येथील खुल्या जागेत बौद्ध विहार सभागृहव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अनावरण सोहळा कार्यक्रम होत असून त्या निमित्ताने महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लोकगीत, भीमगित व सिनेगीत गायक ‘आनंद शिंदे’ यांच्या सुरांची मैफल मेजवानी ३ फेब्रुवारी २०२४ रोजी दारव्हा येथील छत्रपती
शिवाजी महाराज स्टेडियमवर सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
ना.संजय राठोड यांनी यापूर्वी देखील दिग्रस’दारव्हा,नेर च्या जनतेसाठी विकास कामा सोबतच विविध सांस्कृतिक, आध्यत्मिक, कार्यक्रमाचे आयोजन करत असतात
शिवाय सर्व जाती धर्माच्या श्रद्धास्थळांचा विकास करण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात
राज्यात कोणत्याही मतदार संघा पेक्षा अधिक आरोग्य सेवा देण्यासाठी त्यांचा लौकिक आहे.
शिवाय मतदारसंघात युवकांना खेळातील प्रोत्साहन मिळावे म्हणून विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यातही ते अग्रेसर असतात.विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती च्या माध्यमातून दरवर्षी उपक्रम राबविल्यामुळे मतदारसंघात त्यांची लोकप्रियता कधीच कमी झाली नाही असे चित्र आहे.
त्यामुळेच गेल्या अनेक विधानसभा निवडणुकीत कोणीही विरोधक त्यांच्या सोबत स्पर्धा करू शकलेला नाही.
