क्षणाच्या रागाने आयुष्य कसे उद्धस्त होते व व्यसनाचे काय गंभीर परिणाम होतात हे सर्वांनाच कळते पण वळत नाही
अशातून गुन्ह्यांच्या घटना घडतात अशीच एक घटना आर्णी तालुक्यातील जवळा पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या म्हसोला (कान्होबा)येथे घडली.जेवणावरून वाद करून सासऱ्याने दारावर नशेत लाथा मारल्या त्यामुळे जावाई व सासऱ्या मध्ये वाद झाला या वादाचा परिणाम असा झाला की जावायणे सासऱ्या चा मारून खुनच केला रागाच्या भरात झालेल्या या कृतीने आर्णी पोलिसांनी जावायास बेड्या ठोकल्या. व्यसनाने सासऱ्याचा जीव गेला तर रागाने जावयाचा संसार उघड्यावर आला.
याबाबत वृत्त असे की गुरुवार १ फेब्रुवारी २०२४ च्या रात्री ९.३० च्या सुमारास इस्तारी नेवारे (४३) हे आपल्या मुलीकडे रहात होते. घटनेच्या रात्री मुलगी व जावाई रवींद्र बोटरे (३२) झोपलेले असतांना सासरा इस्तारी याने जेवणाच्या कारणावरून दारावर लाथा मारल्या यावरून सासरा व जावाई यांच्यात वाद झाला हा वाद विकोपाला गेला आणि रागाच्या भरात जावयाने घरा समोरील एका लाकडी काडीने सासऱ्या च्या डोक्यावर जोरदार प्रहार केला यात सासरा इस्तारी नेवारे हा गतप्राण झाला
या घटनेची माहिती मिळताच आर्णी पोलीस चे कार्यतत्पर पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने आरोपी जावाई रविंद्र बोटरे यांना अटक केली या घटनेची माहिती मिळताच परिविक्षाधीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक चिलुमुला रजनीकांत यांनीही घटनास्थळी भेट दिली
या गंभीर घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.पवन बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्णी पोलीस करत आहेत.
व्यसन आणि त्यातून निर्माण होणाऱ्या क्रोधातून एकास आपला जीव गमवावा लागला तर दुसऱ्याचा सुखी संसार उघड्यावर पडला.
