पोलीस म्हटलं की गुन्ह्याचा तपास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते.
चोरीच्या घटना किंवा अन्य गुन्हे घडले की गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे हे ठरलेलं असते पण चोरी घरफोडी सारखे गुन्हे घडले तर त्याचा त्रास सर्व सामान्य नागरिकांना होत असतो.चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा वर्षानुवर्षे होत नसल्याचा नागरिकांचा अनुभव असतो मात्र आर्णी पोलिसांनी चोरी व इतर गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी कंबर कसल्याने
विविध गुन्ह्यात चोरी गेलेला सुमारे ७८ लाखांचा ऐवज हस्तगत करून तो फिर्यादीस परत केला. आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण १५ घरफोड्या चे गुन्हे दाखल होते त्यात १२ गुन्ह्यांच्या तपासात आर्णी पोलिसांना यश मिळाले आहे.तपासाच्या याच कामगिरी च्या आधारावर आर्णी पोलीस जिल्ह्यात एक नंबर ठरले आहेत.
आर्णी पोलिसांची कामगिरी लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी आर्णी पोलीस निरीक्षक केशव ठाकरे व त्यांच्या सहकार्यांना सन्मानित करून शाबासकीची थाप दिली.
आर्णीत रामायण सुंदरकांड कथेचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक महिलांच्या पर्स चोरीच्या घटना घडल्या होती पण ठाणेदार केशव ठाकरे यांनी तपासाचे चक्रे वेगाने फिरवीत वर्धा येथील महिला गुन्हेगारांना अटक करून सर्व चोरीचा ऐवज हस्तगत केला.शिवाय मकरसंक्रांत सना पासून महिला वर्ग मोठया प्रमाणात हळदीकुंकू कार्यक्रमास घरा बाहेर पडतात.आशा वेळी महिलांनी काय खबरदारी घ्यावी याविषयी सूचना देण्यात आल्याने कुठलाही चोरीचा प्रकार घडला नाही.
एखादा गुन्हा घडण्याच्या पूर्वी खरदारी घेण्यासाठी केलेल्या जनजागृती चा चांगला इफेक्ट दिसून आला आहे
शिवाय शहरात नियमित गस्त वाढल्याने चोरी च्या घटनांना आळा बसला असल्याचे दिसून येत आहे.
या कामगिरी विषयी बोलतांना ठाणेदार केशव ठाकरे म्हणतात
की जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड व अतिरिक्त पोलीस अधीक्षक चुलुमुला रजनीकांत याच आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन असते शिवाय आमच्या पोलीस स्टेशनचे सर्वच अधिकारी कर्मचारी एकजुटीने तपास कामी योगदान देतात त्यामुळे आमची कामगिरी ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सामूहिक असून त्याचे श्रेय सर्वांचे आहे.
