प्रहार कार्यकर्त्यांनी दिली आर्णी तहसील समोर उपोषण स्थळी भेट
पोलीस स्टेशन आर्णी इमारती साठी शासन मान्यतेनुसार आणि आदेशानुसार १० आर रिक्त जागा मंडळ अधिकारी कार्यालया करिता आरक्षित केलीली5 आर जागा अशी एकूण 15आर आर्णी येथील प्रेमनगर चौकातील जागा अजून दिली नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते प्रलाद इंगळे यांनी या मागणीसाठी दि.२२/१/२४ पासून आमरण उपोषण चालू केले आहे.या उपोषणास भेट देण्यासाठी प्रहार कार्यकर्ते संदिप ढाकुलकर,शुभम गरुड,पत्रकार वीरेंद्र पाईकराव यांनी उपोषण स्थळी भेट देऊन हा प्रश्न आमदार बच्चु कडू यांचे मार्फत शासन दरबारी मांडू असे आश्वासन दिले.
