आर्णी नगर परिषद चे माजी नगराध्यक्षकाँग्रेस पक्षाचे माजी युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस युवा अभ्यासू नेते व उच्च विद्या विभूषित मनमिळाऊ व संयमी असलेले अरीज बेग याची राष्ट्रीय कॉंग्रेचे जाहीर केलेल्या राजीव गांधी पंचायत राज संघटन प्रभारी म्हणून निवड करण्यात आली आहे. काँग्रेस चे राष्ट्रीय नेते वेणूगोपाल यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या निवड यादीत अरीज बेग याचा समावेश करण्यात आल्याने आर्णी कॉंग्रेस मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अरीज बेग यांनी आता पर्यंत काँग्रेस कडून मध्यप्रदेश तेलंगणा त विधानसभा प्रभारी म्हणून चांगली कामगिरी केलेली आहे आता त्याना पुन्हा पक्षाने राष्ट्रीय पातळीवर संधी दिली आहे.
काँग्रेस मध्ये अरीज बेग याना मिस्टर परफेक्ट म्हणूनही ओळखल्या जाते.
अरीज बेग यांच्या निवडी बद्दल माजी मंत्री काँग्रेस चे आदिवासी सेल चे राष्ट्रीय अध्यक्ष जेष्ठ नेते शिवाजीराव मोघे
युवा नेते जितेंद्र मोघे, काँग्रेस चे स्थानिक नेते साजिद बेग,आर्णी तालुका काँग्रेस चे अध्यक्ष सुनील भारती,काँग्रेस चे यवतमाळ जिल्हा सरचिटणीस प्रदीप वानखडे पाटील,राजू गावंडे
आर्णी पंचायत समितीचे माजी सभापती राजू विरखेडे,विलास पाटील राऊत,गुणवंत राऊत,युवक काँग्रेसचे निलेश आचमवार, अमोल मांगूळकर,नितेश पाटील बुटले,निलेश बुटले,अतुल देशमुख, आर्णी ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच छोटू देशमुख
आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल आडे
यांनी अरीज बेग याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.