पोलिसांनी मनावर घेतले तर कुठल्याही गुन्हेगारांच्या मुसक्या ते आवळू शकतात म्हणतात ना जाणून के हाथ बहोत लंबे होते है. याचा प्रत्यय आर्णी पोलिसांनी दाखवून दिला. आर्णी पोलीस स्टेशनचा प्रभार घेतल्या पासून ठाणेदार केशव ठाकरे
गुन्ह्यांच्यातपासात खूप परिश्रम घेतांना दिसत आहेत त्यामुळेच घरफोड्या चोऱ्या दरोडा वाहन चोरी अशा गुन्ह्यांच्या तपासात व मुद्देमाल हस्तगत करण्यात आर्णी पोलीस नवा रूपास आले आहे त्यांचा सन्मान पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी अनेकदा केला आहे.
काही दिवसांपूर्वी जवळा येथे एका बिअर बार मध्ये विदेशी दारूची चोरी झाल्याची घटना घडली होती. यात दोन अरिपींचा सहभाग निष्पन्न झाले होते त्यातील एका आरोपीस पोलिसांनी तातडीने अटक केली होती मात्र एक अरिपी फरार झाला होता. त्याचा शोध देखील कसून सुरू असतानाच फरार आरोपी रोहन इंगळे हा तरोडा नजीक शस्त्र घेऊन डबा धरून घातपात व लूटमार करण्याचा उद्देशाने असल्याची गीपनिय माहिती आर्णी पोलिसांना मिळाली त्यावरून सापळा रचत मोठया शिताफीने पोलिसांनी आरोपीस अटक करून बेड्या ठोकल्या.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बन्सोड,अतिरिक्त पोलीस अधीक्षक चुलूमुला रजनीकांत, अप्पर पोलीस अधीक्षक
पियुष जगताप,उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार
यांच्या मार्गदर्शनात आर्णीचे दबंग ठाणेदार केशव ठाकरे,पोलीस उपनिरीक्षक गजानन आजमिरे, पोलीस उपनिरीक्षक कपिल मस्के, डी.बी.पथकाचे चाणाक्ष पोलीस जमादार गणेश राठोड,
विजय चव्हाण, मिथुन जाधव यांनी केली
आरोपी कडून काही करण्या घातपात आधीच आर्णी पोलिसांनी दिला आरोपीला हात असे म्हणावे लागेल.
