अतिशय प्रतिकूल परिस्थितीत भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर याच जीवन प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री व आदिवासी राष्ट्रीय काँग्रेस चे अध्यक्ष शिवाजीराव मोघे यांनी केले
त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समिती भिमज्योती ट्रस्ट व क्रांतीसुर्य बिरसा मुंडा उत्सव समिती सावरगावं यांच्या संयुक्त विद्यमाने आज सावरगावं येथे भव्य मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास प्रमुख
मोघे साहेब उपस्थित होते यावेळी ते बोलत होते. आदिवासी काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड शिवाजीराव मोघे साहेब उपस्थित होतें. माता रमाई आणि महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करुन या शिबिराची सुरूवात करण्यात आली. परिसरातील शेकडो नेत्ररोग रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेत आपल्या आजाराचे तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने व उपचाराने निदान करुन घेतले. तर अनेक युवा मित्रांनी स्वेच्छेने रक्तदान करून माता रमाईच्या स्मृतीस अभिवादन केले. उपस्थित सर्व रुग्णांशी व रक्तदात्यांशी साहेबांनी संवाद साधला. ग्रामीण भागात आरोग्याच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या शिबिराचे कौतुक करत उपस्थित झालेल्या डॉक्टरांचे व आयोजकांचे आभार व्यक्त केले. यावेळी यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव मेश्राम, मा. प.स उपसभापती विजयजी कडू, तालुका अध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी वैजयंतीताई ठाकरे, रुपेशभाऊ कल्यामवार, देवाण्णा पालेवार, डॉ. मुन, पोलिस उप निरिक्षक वानखेडे साहेब, धम्मपाल मेश्राम, अरविंद चौधरी, गोवर्धन रेड्डी, दशरथ मोहूर्ले, गुलाबराव कन्नलवार, कपिल वानखेडे, रमेश पाटिल, प्रकाश पाटिल, कोंडबा ढाले, पंकज प्रधान, कलावती वानखेडे (उप सरपंच सावरगावं) शंकर पेदटिवार, नारायण गुरनुले, ओंकार जिद्देवार आदि उपस्थित होते…
