चोर जेव्हा चोरी करतो तर तो का चोरी करतो याचे काही मनोरंजक करणे समोर येत असतात
पैशाची चणचण,विलासी वृत्ती, चैन असे विविध करणे समोर येत असतात पण नागपूर पोलिसांनी एका दुचाकी चोरस अटक करून त्याच्याकडून तब्बल १११ दुचाकी हस्तगत करण्यात नागपूर पोलिसांना यश आले असून हा चोरटा चोरलेल्या दुचाकी ९ जिल्ह्यात विक्री करत होता . प्रेम विवाह नंतर संसाराचा गाडा ओढण्यास पैशाची कमतरता व पत्नीचा तगादा यामुळे दुचाकी चोरी करण्याचा वाम मार्ग आरोपींने पत्करला असल्याचे पुढे येत आहे.
याबाबत वृत्त असे की
नागपूरच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई पोलिसांनी केल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी पत्रपरिषदेत दिली. ललित गजेंद्र भोगे (२४, विकासनगर, कोंढाळी) असे आरोपीचे नाव आहे. २१ डिसेंबर रोजी अनिल पखाले (वाडी) यांची दुचाकी चोरीला गेली होती. या गुन्ह्याच्या तपासात त्या परिसरातून अनेक दुचाकी चोरीला गेल्याचे समोर आले. शहरात वाहनचोरीचे प्रमाण वाढल्याने अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल इंगोले यांनी तपास सुरू केला.
ललित भोगे याने कुटुंबियांच्या विरुद्ध जाऊन एका तरुणीशी प्रेमविवाह केला. तो कोंढाळीला राहायला लागला. संसार सुरु झाल्यानंतर घरात आर्थिक अडचणी येऊ लागल्या. पत्नीसुद्धा त्याला पैसे आणण्यासाठी तगादा लावू लागली. त्यामुळे ललितने चक्क दुचाकी चोरीचा धंदा सुरु केला. सुरुवातीला त्याला यश आल्यानंतर त्याने जवळपास ३ हजारां पेक्षा जास्त दुचाकी चोरल्याचा संशय आहे.