पुण्य करनार्याच्या हातून कस पाप झालं
माहित नाही त्याले कस आपो आप झालं
ज्यान भावाले देली उपमा विभिषनाची
सिता हरनाच ज्याच्या हातून पाप झालं
भरत आल्या पायल्या उतरंडीले घराच्या
ओसरीच्या हातूनच रिकाम माप झालं
राखनिले ठेवले होते प्यादे आमी घराच्या
त्याच चोरायच्या हातून घर साफ झालं
आटन ‘डोबरं, गुर्मित जे होत साचलेल
एका किरनाच्या गर्मीन पाणी वाफ झालं
विजय ढाले
#बिब्बा
साभार फेसबुक पोस्ट