निर्भय बनो च्या टीमने बिघडविले
भाजपाचे गणित…
आपल्या पायाला भिंगरी लावल्यागत संपुर्ण मतदार संघ पालथा घालत निर्भय टीमच्या सदस्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विजयाचे गणित बिघडविले.
कवी लेखक साहित्यीक सेवा निवृत्त अधिकारी पटवारी ग्रामसेवक शिक्षक प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षिका समजसेवक असे एक ना अनेकांच्या जथ्थ्या जथ्थ्याच्या चमुने भाजपा विरोधात अक्षरशा रान ऊठविले आहे.
अत्यंत कसलेली विद्वान मंडळी या निर्भय बनो टीमचे धुरकरी आहेत.राजकारण व समाजकारणाशी नाळ घट्ट असलेले अत्यंत पोटतिडकिने कार्य करनारे आपल्या संविधाना प्रती आपल्या कर्तव्याप्रती लढा देनारी ही मंडळी दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करुन संपुर्ण चंद्रपुर आर्णी लोकसभा मतदार संघात आपल्या विचारांची पेरणी करत भाजपाचा बिमोड करन्या करीता वैचारीक विळ्याने भाजपा सारख्या कुपमंडूक अवैचारीक भ्रष्ट पक्षाचे आलेले विषारी पिक कापन्यास मतदार संघात आपली वेगळी सेना तयार करीत आहे.
या वैचारीक निर्भय बनोचा शाहु फुले आंबेडकरांचा वैचारीक जन जनात वारसा पेरतांना दिसतो आहे.
यात सुप्रसिद्ध विद्रोही वर्हाडी कवी विजय ढाले,सुनिलजी सुखदेवे,अजाबराव बुटले,तुळशिदास मोरकर,किशोर रावते,ललित नाफडे,श्री मोहोड सर,शेख फाजिल,प्रकाश कुडे आदींचा उस्फुर्त झंझावात आहे.
यांची संविधान संस्कृती व लोकशाही प्रती असलेली ही मेहनत निच्छित फळास येईल.