नगर सुधार समितीतर्फे भीम जयंती उत्साहात
मा.आ.बाळासाहेब मूनगिनवार यांची उपस्थिती
आर्णी:- शहरातील सोनार लाईन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नगर सुधार समिती आर्णी यांच्याकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
१४ एप्रिल म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणाऱ्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती.भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात.
अशा या महामानवाची १३३ व्या जयंतीचे आयोजन नगर सुधार समिती आर्णी चे अध्यक्ष तथा पत्रकार संघाचे अध्यक्ष आबिद फानन यांच्यातर्फे करण्यात आले होते.रविवार दि.१४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता आर्णी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित मा.आ.बाळासाहेब मुनगीनवार,राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे जिल्हा उपाध्यक्ष युनूस शेख,ऊपाधक्षा सो. पूजा ढाले, सचीव राहूल ढोरे, राजू इंगोले, बबिता शिवणकर, परवेज बेग मिर्झा, रंजना आडे, करण शेलकर, प्रसाद जाधव, फारुख धारीवाला, मनोज माघाडे,अक्रम दूंगे, राजीक शेख, अशोक सकवान, प्रफुल्ल जाधव, साजिद मलनस, मयूर अरणकर, सोहेल चव्हाण ऊपस्थीत होते