7k Network

पंजाब चे फावले सामना अनिर्णित कलकत्ता व पंजाब संघाला प्रत्येकी एक एक गुण

भारतात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला झटपट क्रिकेट चा प्रकार म्हणजे टी ट्वेन्टी हा प्रकार इंडियन प्रीमिअर लीग आय पी एल च्या नावाने सुपरिचित आहे यात देशातील विविध राज्याच्या नावाने संघ बनवले जातात त्यात संपूर्ण जगातील क्रिकेट पटू चा समावेश असतो मोठी बोली लावून या खेळाडूंना एका मोसमा साठी विकत घेतल्या जाते.

टीव्ही वरील प्रक्षेपण जाहिराती मैदानावरील तिकीट विक्री यातून या प्रकारात अमाप पैसा खेळाडूला मिळतोच शिवाय प्रसिद्धी देखील मिळते अनेक नवोदित खेळाडूंना संधी देखील मिळते.या प्रकारात चांगले प्रदर्शन करत अंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडूंना संधी मिळाली असल्याचे पहायला मिळते.

२०२५ चा आय पी एल मोसम सुरू असून प्रत्येक संघ चुरशीचा खेळ करत संघाला विजयी करून देण्याचा प्रयत्न करतो व गुनतालिकेत वरचढ रहाण्यासाठी धडपडत असतो.भारतात हे सामने उन्हाळ्यात खेळवले जातात व दिवसरात्र खेळले जातात कारण वातावरण चांगले असते या मोसमात सर्व सामने निर्विघ्नपणे पार पडले परंतु काल झालेल्या कोलकत्ता नाईट रायडर व पंजाब किंग्ज यांच्यात ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेला सामन्यावर पावसाने पाणी फेरले. पंजाब किंग्जच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात २०१ धावा करत कोलकाता नाईट रायडर्ससमोर २०२ धावांचे आव्हान  दिले  होते. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी कोलकाता संघाची सलामी जोडी मैदानात उतरली. पण अवकाळी पावसाच्या व्यत्ययामुळे  सामना रद्द करण्यात आला. दुसऱ्या डावातील पहिल्या षटकानंतर पावसाला सुरुवात झाली. खेळ थांबला त्यावेळी कोलकाता संघाने बिन बाद ७ धावा केल्या होत्या. रहमनुल्लाह गुरबाझ १ (३) आणि सुनील नरेन ४ (३) नाबाद खेळत होते. कमीत कमी ५ षटकांचाही खेळ होऊ न शकल्यामुळे अखेर सामना रद्द करण्याची वेळ आली. परिणामी दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला. यामुळे पंजाब संघाचे फावले असून गुण तालिकेत या संघाने मुंबई च्या संघाला माघे टाकले आहे.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!