खेळातही कधी कधी नशीब बलवत्तर असावे लागते कधी काळी आय पी एल चे सर्वाधिक चषक ट्राफि जिकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचा १८ वा मोसम फारसा चांगला राहिला नाही.केवळ ५ सामने जिंकत १० गुणच प्राप्त झालेले असतांना गुंतालिकेत ५ सामने जिंकणारा पंजाब किंग ईलव्हन संघ १० गुण मिळवत मुंबई च्या बरोबरीने होता पण काल झालेल्या सामन्यात कोलकत्ता नाईट रायडर विरुद्ध पंजाब संघ पराभूत झाला असता तर मुंबई वरच्या स्थानावर असती मात्र सामना रद्द होऊन एक गुण मिळाल्याने मुंबई इंडियन्स ला फटका बसला.मुंबई १० गुणांवर तर पंजाब ११ गुण मिळवून वरचढ ठरला.
कोलकाता विरुद्ध पंजाब सामना रद्द झाल्याने गुंतालिकेत चौथ्या स्थानी असलेल्या मुंबई इंडियन्सला मोठा झटका बसला आहे. या सामन्याआधी मुंबई आणि पंजाब हे दोन्ही संघ प्रत्येकी ५-५ विजयांसह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी होते. पंजाबच्या तुलनेत नेट रनरेट चांगला असल्याने मुंबई चौथ्या स्थानी होती. मात्र सामना रद्द झाल्यानंतर कोलकाता आणि पंजाबला प्रत्येकी १-१ गुण मिळाला. त्यानंतर पंजाबचे ११ गुण झाले. पंजाबला या १ गुणासह गुंतालिकेत एका स्थानाचा फायदा झाला. पंजाब यासह चौथ्या स्थानी पोहचली. त्यामुळे मुंबईची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे.