एका पत्रकाराने ओळख निर्माण झालेल्या सामाजिक व पत्रकारितेत काम करणाऱ्या महिलेला सोशिअल मीडिया च्या माध्यमातून संदेश पाठवणे चांगलेच अंगलट आले असून त्या महिलेच्या फिर्यादी वरून कथित वृत्त पत्राच्या त्या पत्रकारा विरुद्ध कलम भारतीय न्याय संहिता नवीन ७५ व ७८ नुसार आर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
व्हाट्स अप वर लज्जास्पद संदेश पाठवण्याचे कृत्य हे महिलेचा विनयभंग करणारे असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जाते.तक्रार दाखल केल्यावर देखील काही दिवस हे प्रकरण सामोपोचाराने मिटेलअसे पोलिसांना वाटत होते पण तसे झाले नाही अखेर त्या महिलेच्या आग्रही भूमिके मुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला या प्रकरणी आपला दोष नसल्याचे संमधीत पत्रकाराने सोशिअल मीडियावर म्हटले असले तरी त्या पाहिले विषयी बदनामी करण्याचे काम पत्रकाराने केले असा आरोप त्या पीडित महिलेने केला असून पुढील तपास आर्णी पोलीस करत आहेत यामुळे आर्णी च्या पत्रकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.